मायेच्या हळव्या
स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या
बंधात धुंद
मोहरते
मन उधाण वाऱ्याचे,
गूज पावसाचे,
का होते बेभान,
कसे गहिवरते
!
आकाशी स्वप्नांच्या
हरपून भान शिरते,
हुरहुरत्या
सांजेला कधी
एकटेच झुरते
सावरते, बावरते,
घडते, अडखळते
का पडते ?
कधी आशेच्या
हिंदोळ्यावर
मन हे वेडे
झुलते
मन तरंग होऊन
पाण्यावरती
फिरते
अन् क्षणात
फिरुनी आभाळाला
भिडते !
मन उधाण वाऱ्याचे,
गूज पावसाचे,
का होते बेभान,
कसे गहिवरते
!
रुणझुणते, गुणगुणते,
कधी गुंतते,
हरवते,
कधी गहिऱ्या
डोळ्यांच्या
डोहात पार बुडते
तळमळते सारखे
भाबडे नकळत
का भरकटते ?
कधी मोहच्या
चार क्षणांना
मन हे वेडे
भुलते !
जाणते जरी हे
पुन्हा पुन्हा
का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या
मागून पळते
!
मन उधाण वाऱ्याचे,
गूज पावसाचे,
का होते बेभान,
कसे गहिवरते
!