कंठ आणि आभाळ
दाटून येती
आणि कोसळती
..... सरीवर
सरी !
पहिल्या उन्हाची
हळद ओली होती
फांदीवर पाने
जन्म घेत होती
भवताल त्यांना
अजून ठाऊक नव्हता
अशा वेळी आल्या
..... सरीवर
सरी !
आणि कोसळल्या
..... सरीवर
सरी !
आता कुठे नुकतेच
पंख लांब केले
आता कुठे घरट्यातून
फांदीवर आले
आभाळ या पिलांचे
खूप लांब आहे
अशा वेळी आल्या
..... सरीवर
सरी !
आणि कोसळल्या
..... सरीवर
सरी !