A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज गोकुळात रंग खेळतो

आज गोकुळात रंग खेळतो हरी;
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी !

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी !

सांग श्यामसुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले !
एकटीच वाचशील काय तू तरी !

त्या तिथे अनंगरंगरास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिर्‍यांत वाजला
हाय ! वाजली फिरून तीच बासरी !
अनंग - मदन.
चटोर - चावट.
मंजिरी - एक प्रकारचे घनवाद्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.