A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आले वयात मी बाळपणाची

आले वयात मी, बाळपणाची संगत सुटली
गोर्‍या गाली प्रीतीची लाली अवचित उठली !

निशिदिनी बाई मी मनामध्ये तळमळते
ही नवखीच कसली हुरहुर मज जाळते
जीव होतो गोळा
झोप नाही डोळा
येतो दाटुन गळा
सख्यासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली !

तू जिवलग माझा, बाळपणातील मैत्र
बोल हसुन जरा, बघ फुलांत नटला चैत्र
एका ठायी बसू
गालागालांत हसू
डोळा मोडून पुसू
चार डोळे भेटता दोन मने एकवटली !
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - आनंदघन
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - राम राम पाव्हणं
गीत प्रकार - चित्रगीत
ठाय - स्थान, ठिकाण.
निशिदिनी - अहोरात्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.