A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आली दिवाळी आली दिवाळी

आली दिवाळी आली दिवाळी
घर घर उजळीत मानवतेचे
तेजाच्या पाउली

नक्षत्रांचे बांधून तोरण
मनामनांचे करुनी मीलन
दिव्य ज्योत ही आनंद-हृदयी
गोविंदे लाविली

रत्‍नकांचनी लावुन ज्योती
मंगलमय सजवून आरती
बहीण लाडकी भाऊराया
ओवाळू लागली

भावाविण हा दिन सोन्याचा
आज उदासिन या बहिणीचा
हो‍ऊन बंधू ये रे चंद्रा
दीपांच्या राउळी
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- आशा भोसले
चित्रपट - बायकोचा भाऊ
गीत प्रकार - चित्रगीत
कांचन - सोने.
राऊळ - देऊळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.