A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आली प्रणय-चंद्रिका करी

आली प्रणय-चंद्रिका करी
सुंदरी, मदनाची मंजिरी !

जशी झळकते चटकचांदणी
कामिनी राजहंसगामिनी !

नवती नवनीताच्यापरी
मुलायम माषुक मख्खन-परी !

जिचिया उरोज-बहरावरी
कंचुकी तटतटली भरजरी !

चेतवी मदनरंग-दीपिका
दिलाच्या रंग-महालांतरी !
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे, प्रभाकर भालेकर
स्वराविष्कार- रामदास कामत
प्रकाश घांग्रेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मदनाची मंजिरी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
उरोज - स्‍त्रीचे स्‍तन.
कंचुकी - चोळी.
गामी (गामिक) - जाणारा.
चेतवणे - उद्दीपित करणे, पेटवणे.
चंद्रिका - चांदणे.
नवती - तरुणी / तारुण्य / नवी पालवी.
नवनीत - लोणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  रामदास कामत
  प्रकाश घांग्रेकर