A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आह्मी जातो आपुल्या गावा

आह्मी जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हेचि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥

आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥

येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥

रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥
गीत - संत तुकाराम
संगीत - अण्णा जोशी
स्वराविष्कार- मन्‍ना डे
बालगंधर्व
स्‍नेहल भाटकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- मन्‍ना डे, संगीत- अण्णा जोशी.
• स्वर- बालगंधर्व, संगीत- सुधीर फडके, चित्रपट - विठ्ठल रखुमाई (१९५१).
• स्वर- स्‍नेहल भाटकर, संगीत- ???.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मन्‍ना डे
  बालगंधर्व
  स्‍नेहल भाटकर