आम्ही सारे खवैय्ये
आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे
ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे,
सोस आहे चमचमीत खाण्याचं, ते-
आम्ही सारे खवैय्ये !
एकमेकां शिकवीत, नवे काही बनवावे
कितीकिती चोचले ते जिभेचे हे पुरवावे
छान छान देशी-विदेशी पदार्थ जाणून घ्यावे
चुकता-चुकता करता-करता खावे अन् खिलवावे
आम्ही सारे खवैय्ये !
ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे,
सोस आहे चमचमीत खाण्याचं, ते-
आम्ही सारे खवैय्ये !
एकमेकां शिकवीत, नवे काही बनवावे
कितीकिती चोचले ते जिभेचे हे पुरवावे
छान छान देशी-विदेशी पदार्थ जाणून घ्यावे
चुकता-चुकता करता-करता खावे अन् खिलवावे
आम्ही सारे खवैय्ये !
| गीत | - | मंगेश कुळकर्णी |
| संगीत | - | अशोक पत्की |
| स्वर | - | स्वप्नील बांदोडकर |
| ( शीर्षक गीत, मालिका- आम्ही सारे खवैय्ये, वाहिनी- झी मराठी ) |


















