आश्रम की हरिचे हे

आश्रम की हरिचे हे गोकुळ
भासतसे वनवासही मंगल

गोधन देई अमृतधारा
मुरली घुमवी तो मंजुळ वारा
दूर सावळी सरिता यमुना
आठवणींची छेडित वीणा
जीवन रम्य निरागस निर्मळ

नंदनंदना भाऊराया
तुझिच छाया दिसे वनी या
वार्‍यांनो, जा द्वारावतीला
निरोप सांगा श्रीकृष्णाला
संभ्रमी रे तव भगिनी प्रेमळ
द्वारावती - द्वारका.

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा