आवडती वस्तू लोभानें
आवडती वस्तू लोभानें ।
पसरिला घ्यावयालागि हात किं यानें ॥

सकल करांगुलिंवर रेखा या दिसति ।
किं सविमल जालमिषानें ॥

कमल सकाळीं किंचित फुलतां
अविरलनवदलपरि मी मानें ॥