A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अंगणी माझ्या मनाच्या

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचु लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसु लागले
अशा चिंब ओल्या क्षणी
पुकारे तुझी साजणी !

चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी
धुंद नाचते उन्मनी
पुकारे तुझी साजणी !

गार वारा मन भरारा शिरशिरी देही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे
खोड ही तुझी रे जुनी
पुकारे तुझी साजणी !
उन्मनी - देहाची मनरहित अवस्था.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.