A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अशी न राहील रात्र

जा अशी झेलीत तू घण दु:खाचे नारी
या दु:खातून उजळून येईल भाग्य तुझे संसारी

अशी न राहील रात्र निरंतर
प्रकाश येतो रात्रीनंतर

लढता लढता येथे जगणे
हसता हसता घाव सोसणे
पाऊल पुढचे पुढे टाकणे
जीवन हा संग्राम खरोखर

चुकले नाही दु:ख कुणाला
सीता, अहल्या, दमयंतीला
ध्येयापासून नाही ढळल्या
झेलुनिया संकटे शिरावर
अहल्या - ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्‍नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.