A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अति कोपयुक्त होय परि

अति कोपयुक्त होय परि सुखविते मला ।
भृकुटि वक्र करुनि बघत ।
गाल लाल सर्व होत ।
थरथर तनु कांपवीत इंदुवदनिं घर्म सूटला ॥

जणू कनकाची मूर्ति अग्‍निमाजिं तावली ।
कीं नभ सोडुनि वीजचि खालिं उतरली ।
कीं ज्वलनाची ज्वाला कुंडात पेटली ॥

एक जागिं पद न ठरत ।
हृदय भरत रिक्त होत ।
अधरबिंब काय फुटत । तेंवि वरी दंत रोंविला ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर- छोटा गंधर्व
नाटक - सौभद्र
चाल-'आसखिय भटदिबपरब्याडो' या कानडी पदाच्या चालीवर.
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अधर - ओठ.
इंदु - चंद्र.
कनक - सोने.
घर्म - घाम.
भृकुटी (भ्रू) - भिवई.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.