A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बहुतपरिनें उपदेश तुवां

बहुतपरिनें उपदेश तुवां केला । परि कामांधिं म्यां न आदरिला ॥

तुझ्या स्‍नेहा पात्र मी नसें आतां । व्यर्थ माझी वाहसी मनीं चिंता ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- बालगंधर्व
नाटक - शापसंभ्रम
गीत प्रकार - नाट्यसंगीत
हें 'शापसंभ्रम' नांवाचें संगीत नाटक इंदूरचे महाराज श्रीमंत शिवाजीराव यांच्या रसिकतेचें व औदार्यांचें फल होय.

सुप्रसिद्ध व सर्वमान्य अशा बाण कवीच्या सुरस कादंबरींतील कथानकाच्या आधारानें हें रचिलें आहे. इंदूरस्थ विद्वान् परीक्षकांच्या व महाराजांच्या जसें हें, पसंतीस उतरलें, तसेंच महाराष्ट्रीय रसिकजनांच्या आदरास पात्र झालें ह्मणजे मी कृतज्ञ झालों.

या नाटकांतील बहुतेक पद्यें संगीतप्रिय रसिकांस सहज ह्मणतां यावींत, म्हणून तीं मीं मुद्दाम सर्वांच्या श्रवणपरिचयांतील व आवडीच्या अशा चालींवर रचिलीं आहेत. तथापि एका पद्यास दुसर्‍याही चाली लागतात; त्या समय व रस मनांत आणून लावणें हें गानकुशल पात्रावरच सर्वस्वी अवलंबून आहे.
(संपादित)

गोविंद बल्लाळ देवल
'शापसंभ्रम' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- हरि नारायण गोखले (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.