A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भुलविलेस साजणी

भुलविलेस साजणी, तू विलोल लोचनी
फुलविलेस मन्मनी स्वप्‍न एक कांचनी

तू न रूपगर्विता
तू न धुंद चारुता
सांज-सावळीच तू सांडिलीस मोहिनी

तू न गायिका कुणी
गाइलीस रागिणी
बोल लाजरे तुझे गीत फुलविती मनी

तू सुशील साधिका
स्‍नेहशील दीपिका
प्रेमभाव उधळुनी जाहलीस स्वामिनी
कांचन - सोने.
चारू - सुंदर.
विलोल - चंचल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.