A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चिन्मया सकल हृदया

चिन्मया सकल हृदया, सदया दे या गोविंदा
वरवरदा कलिमलविलया ॥

विषयपिपासा पीडितसा, नि:सारा, संसारा,
मृगनीरासम भुललों मी, परि फसलों
विस्मरलों तव भजनीं लागाया ॥

कामधनाशा ही विवशा, मन्‍नाशा,
सरसावे तत्पाशीं सांपडलों, यें धांवोनी
यांतूनी सोडवुनी मज घ्याया ॥

सौख्य सदां नव ज्या ठायीं,
तापाचा पापाचा लेश नसे, शांति वसे,
ने, येवोनी त्या स्थानीं, सुखभुवनीं दासा या ॥
चिन्मय - चैतन्यमूर्ती / शुध्द ज्ञानाने, बुद्धीने (ईश्वर, ब्रह्म) युक्त.
ठाय - स्थान, ठिकाण.
नि:सार - सत्त्वहीन.
पिपासा - तहान.
पृथक्‌

'संगीत संशयकल्लोळ' नाटकातील हे पद (भरतवाक्य) आहे. या नाटकाचे संगीत गो. ब. देवल यांचे आहे. 'गंधर्व नाटक मंडळी' सादरकर्तेवेळी हे पद गायले जात नव्हते. तद्वत या पदाच्या मूळ स्वराविष्काराची ध्वनीफित अनुपलब्ध आहे.

'बालगंधर्व' या २०११ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात हे पद घेण्यात आले. त्यात कौशल इनामदार यांनी, या पदाची, नाटकाच्या मूळ संगीताचा डौल सांभाळणारी समर्पक चाल बांधली आहे.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.