A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घुमला हृदयी नाद हा

घुमला हृदयी नाद हा
झन झन झन झरत नाद, झरत नाद हा
घुमला हृदयी नाद हा

मी मनमोर बावरी
घे गुंफुनि घे मजला करी
मिठी मध्ये घे रे तू सत्वरी
मज मिठीत घे असा श्रीहरी
जडू दे मदनबाधा
घुमला हृदयी नाद हा

किती छळिशी मला रे सजणा
जरी सरला तरुणपणा
किती छळिशी मला रे सजणा
खडा बसला घड्यावर ना
करु नको रे खुणा पुन्हा पुन्हा

हलव जरा गगनतुरे, हळूच प्रिया रे
करुनी असा अलगदसा फुलगजरा रे
हलव जरा गगनतुरे
सुखवी मला मद भरल्या तव नजरा रे
रोजरोज स्पर्श हाच भासतो नवा

दाटली सावली झोंबतो गारवा
कुंतली माळिला प्रीतीचा मारवा
श्वास हा रे तुझा भासतो पारवा
पापणीत उमटु दे पडसाद हा.
गीत - चंद्रकांत खोत
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर- अनुराधा पौडवाल
चित्रपट - यशोदा
गीत प्रकार - चित्रगीत
पारवा - कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.