गोड गोजिरी लाज लाजरी

गोड गोजिरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारीं

करकमलांच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे
हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे
नथणीं-बुगडी लाजे,
रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणिमंगळसरीं

भरजरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी
लग्‍नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी
अंतरपाट सरे,
शिवा पार्वती वरे, लाडकी ही जाई ताई दुरीं
बुगडी - स्‍त्रियांचे कर्णभूषण.

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा