गुरुविण नाही दुजा आधार

गुरुविण नाही दुजा आधार

रडता-पडता कोठे अडता तोच नेतसे पार
गुरुविण नाही दुजा आधार

गुरु परमेश्वर गुरु माऊली
सदा कृपेची देई साऊली
भक्तांसाठी गुरु होऊनी देव घेई अवतार

स्मरण करावे नाम वदावे
वंदन पूजन करीता भावे
प्रसन्न होते गुरु माऊली सुख दे अपरंपार

शरण तुम्हाला आम्ही प्रभूवर
जगा दिसू द्या तुमचे अंतर
जड मायेतून सत्यरूप तव होऊ द्या साकार
गीत-
संगीत - अशोक पत्की
स्वर- अजितकुमार कडकडे अनुराधा पौडवाल
चित्रपट- गोष्ट धमाल नाम्याची

 

Random song suggestion