A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा चंद्र तुझ्यासाठी

हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी
आरास ही तार्‍यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अशा वेळी मज याद तुझी आली
ये ना

मोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे
नाव तुझे माझ्या ओठांवर येते
फूल जसे की फुलताना दरवळते
इतके मज कळते, अधुरा मी येथे
चांदरात ही बघ निसटून जाते
बांधीन गगनास झुला
जर देशील साथ मला
ये ना

मोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

हे क्षण हळवे एकान्‍ताचे, दाटलेले माझ्या किती भवताली
चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तू मजला ते ऐकावे
होऊन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनी न तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला
दे आता हाक मला
ये ना

मोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू
अनुराग - प्रेम, निष्ठा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.