A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हसतिल मजला कबीर मीरा

हसतिल मजला कबीर मीरा, हसतिल तुलसीदास
हरि तुझा लागे छंद मनास !

कुठे मनीचा क्षुद्र काम तो, कोठे अमृत-आस?
कुठे सरोवर कोठे सागर, तुलना करू कशास?

नक्षत्रांकित चंद्र कुठे तो, कुठे सानुली काच?
कुठे स्वर्गिचा कल्पतरू अन्‌ कोठे मरवा-पाच?

कबीर गाई, गाते मीरा गाती तुलसीदास
गीत भाबडे गाउ कुणा मी? प्रभु घे तुझे तुलाच !
कल्पतरू - कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.
मरवा - सुगंधी पाने असलेली एक वनस्पती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.