हसुनि एकदा मला मुकुंदा

हसुनि एकदा मला मुकुंदा, केलीस का रे वेडे ?
चित्र तुझे रे नेत्र काढते, बघ ना माझ्याकडे

मोरमुकुट तो तुला शोभला
चंद्र केशरी भाळीं रेखिला
नकळत जुळले कर गोपाळा
नको मिटु तू नेत्रकमळा, प्रीत भृंग सापडे

अधर चुंबनी मधुरा रमली
नको श्रीधरा घुमवु मुरली
ढळे पापणी गळे कुंचली
सुरासंगती अंतराळी चित्तपाखरू उडे

कुणी अपुरे ते पूर्ण केले
चित्र तुझे रे मीच झाले
हसलासी तू विश्व हसले
चंद्र काळा नवल घडले, लख्ख चांदणे पडे

 

Random song suggestion
मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा