ही बहु चपल वारांगना
ही बहु चपल वारांगना ।
साहस, दंभ, लोभ कपटानृत
भाषण टाकिल कशि या स्वगुणा ॥

प्रेमचित्रिका दिधली तीतें ।
अर्पी परि ती प्रिय पुरुषातें ।
कुललीला या तिच्या देति संताप मना ॥