A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
होतों द्वारकाभुवनीं

होतों द्वारकाभुवनीं ।
पाहिली प्रिया नयनीं ।
पूर्ण होती मला वशिनी ।
कसा शठ ती वरिल कामिनी ॥

ती तरुणी मजला निरखुनि वर
शशिकर-विकसित कुमुदिनिपरि
हरिखुनि किंचित मुरडुनि
मधुर स्मित करिकरीगमनी ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर- शरद जांभेकर
नाटक - सौभद्र
चाल-कर्पुधवलांगा या कर्नाटकी चालीवर
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कुमुदिनी - श्वेतकमळाची वेल.
करिकरी - हत्ती.
शठ - लुच्‍चा, ठक.
शशी - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.