A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जातां पंढरीस सुख वाटे

जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ।
ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥

सेना ह्मणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
वेणु - बासरी.
वैष्णव - विष्णुभक्त.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.