A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जीवनाची वाट वेडी

जीवनाची वाट वेडी, ती कधी ना संपते !
थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते?

आसवांसाठीच डोळे, पापण्यांचे रांजण
हुंदक्यांचा हक्क येथे, हासण्यावरी बंधन
एकटे बिन-चेहर्‍याचे दैव केवळ हासते

भोवताली दिसती जे जे ते सुखाचे सोबती
जीवनी कोणी न साथी, कोण धावे संकटी?
मरण घेऊन रूप गोंडस जगून पुन्हा पाहते
गीत - गंगाधर महाम्‍बरे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- आशा भोसले
चित्रपट - सोबती
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.