झडल्या भेरी झडतो

झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका

तोंड लागले आज लढ्याला
चहूबाजूंनी येईल घाला
छातीवरती शस्‍त्रे झेला
फिरू नका रे डरू नका, डरू नका

शपथ तुम्हाला शिवरायाची
मराठमोळ्या मर्दुमकीची
समर्थ गुरु केसरी टिळकांची
विजयाच्या या ऐका हाका, ऐका हाका

निशाण अपुले उंच धरा
शूरपणाची शर्थ करा
कराच किंवा रणी मरा
बहाद्दरांनो मरणा जिंका, मरणा जिंका
भेर - मोठा नगारा. नौबत.

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा