A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झाडावरती घडे लटकले

ओळखणार ना बरोबर, ओळखा हं !

झाडावरती घडे लटकले, घड्यात होते पाणी
त्या पाण्याच्या वड्या कापूनी कुरुकुरु खातो कोणी
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खोबरं

अफगाणातील इजार भारी त्याच्या हाती मोती
त्या मोत्यांना उन्हात सुकवून पोरेबाळे खाती
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - मनुका

कोकणातला पिवळा बाळू फार लागला माजू
पकडून आणा भट्टीवरती काळिज त्याचे भाजू - काजू

तालमीतला पोर मारतो तिठ्ठयावरती थापा
सुरकुतलेली बोटे त्यांचा गोड लागतो पापा
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खारका

आधी होतीस काळीपिवळी नंतर झालीस गोरी ग
देवळातुनी का ग फिरती वेणूगावच्या पोरी
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खडीसाखर

चट्टामट्टा बाळंभट्टा, आता मागील त्याला रट्टा
पंजा चाटीत निजेल गुपचूप तो वाघाचा पठ्ठा

आता झाली खिरापत
इजार (विजार) - Trousers / Pants.
खिरापत - कथेच्या शेवटी वाटतात तो प्रसाद.
चट्टामट्टा - खाऊन संपवणे.
तिठा - तीन रस्‍ते मिळण्याची जागा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.