A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काय पुरुष चळले बाई

काय पुरुष चळले बाई । ताळ मुळीं उरला नाहीं ।
धर्म-नीति-शास्त्रें पायीं । तुडविती कसे हो ॥

साठ अधिक वर्षें भरलीं । नातवास पोरें झालीं ।
तरिहि नव्या स्त्रीची मेली । हौस कशि असे हो ॥

घोडथेरड्यांना ऐशा । देति बाप पोरी कैशा ।
कांहिं दुजी त्यांच्या नाशा । युक्ति कां नसे हो ॥

शास्त्रकुशल मोठे मोठे । धर्म-गुरुहि गेले कोठें? ।
काय कर्म असलें खोटें । त्यांस नच दिसे हो ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- बालगंधर्व
नाटक - शारदा
राग - पिलू
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.