A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कांचनस्वप्‍ने नाचत उधळत

कांचनस्वप्‍ने नाचत उधळत हसली रात पुनवेची
श्यामसुंदरासवे रंगली राधा गोकुळची

राजस श्रीहरी मदन जणू तो
कस्तुरी-मळवट भाळी शोभतो
हार फुलांचा कंठी रुळतो
अधरी पावा वाजवी मंजुळ, माखली उटी चंदनाची

राधेचा घननीळ सावळा
गोकुळचा तो मुरलीवाला
घुमवित आला सप्तसुराला
गोकुळचा तो मुरलीवाला, चोरिली नीज राधिकेची

यमुनालहरी हरिगुण गाती
पायी पैंजण रुणझुणु करती
वाजवी पावा तो जगजेठी
रंगले गोकुळ रंगली गौळण, रंगली सखी मोहनाची
कांचन - सोने.
जगजेठी - जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर.
पावा - बासरी, वेणु.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.