केतकीच्या बनी तिथे

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर

पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला ग आसावला सूर

भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले
स्वप्‍नरंग स्वप्‍नीच्या सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला ग भारला चकोर
आसावणे - आतुर, उत्सुक.
कौमुदी - चांदणे.
चकोर - चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी.

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा