A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खेळ तुझा न्यारा

तुझे सर्वरंगी रूप उदारा, कळले सांग कुणाला?
खेळ तुझा न्यारा, प्रभु रे खेळ तुझा न्यारा !

स्वार्थाभवती दुनिया फिरते
बेईमान ठरते भलाई, बेईमान ठरते
सौद्यासाठी जुळते नाते फसवा भावफुलोरा !

आशेमधुनी जीवन फुलते
मरणाशी अडते पाऊल, मरणाशी अडते
हे मायावी मृगजळ खोटे उरतो दूर किनारा !

दोन दिसांची सगळी नाती
कुणी न उरे अंती सोबती, कुणी न उरे अंती
पैलतिराची हाक ऐकता स्मरतो एक सहारा !
मृगजळ - आभास.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.