A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणीतरी सांगा गे

कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥१॥

हाती घेउनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल ।
होतें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥२॥

माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण ।
त्याला ह्मणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥३॥

एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय ।
कृष्णा जाणावें तें काय । कोणी तरी सांगा गे ॥४॥
मूळ रचना

माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥१॥
हाती घेऊनियां फूल । अंगणीं रांगत आलें मूल ।
होतें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥२॥
माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण ।
त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥३॥
संगे घेऊनि गोपाळ । बाळ खेळे अळुमाळ ।
पायीं पोल्हारे झळाळ । गळां माळ वैजयंती ॥४॥
एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय ।
कृष्णा जाणावें तें काय । कोणी सांगा गे ॥५॥

(अळुमाळू - अल्प, झळाळ - चमक, पोल्हार - पैंजण, वैजयंती - विष्णूच्या गळ्यातली काळी माळ)

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.