माघाची थंडी माघाची

माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता ?

रोमारोमांत चांदणं फुललं, हो फुललं
तुमच्या मिठीत सपान झुललं, हो झुललं
राया कशाला खिडकी मिटता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता ?

मला कशानं आली जाग ?
भर थंडीत भिनली आग
मन चोरून मिशीत हसता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता ?

बघा शिवारी कणीस हललं, हो हललं
नव्या माघानं हो रसरसलं, रसरसलं
किती व्हटानं मोती टिपता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता ?
गीत- प्रवीण दवणे
संगीत - यशवंत देव
स्वर - रंजना जोगळेकर
गीत प्रकार - लावणी

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा