A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझी रेणुका माउली

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ।
जैसी वत्सालागी गाय, तैसी अनाथांची माय ॥१॥

हाकेसरशी घाई घाई, वेगे धावतची पायी ।
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥

खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने ॥३॥
कल्पवृक्ष - इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.
वत्स - मूल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.