A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या मना लागो छंद

माझ्या मना लागो छंद ।
गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

तेणें देह ब्रह्मरूप गोविंद ।
निरसेल नामरूप, गोविंद ॥२॥

तुटेल सकळ उपाधि ।
निरसेल आधि-व्याधी, गोविंद ॥३॥

गोविंद हा जनीं-वनीं ।
ह्मणे एका जनार्दनीं ॥४॥
आधि - मानसिक व्यथा.
उपाधि - पीडा, त्रास, व्यथा.
मूळ रचना

माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥
तेणें निरसेल बंधन । मुखीं वदे नारायण ॥२॥
ब्रह्मरूप होय काया । माया जाईल विलया ॥३॥
होय सर्व सुख धणी । चुके जन्ममरण खाणी ॥४॥
ह्मणे एका जनार्दन । सदा समाधान मन ॥५॥

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.