A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मम हृदयाची ललित रागिणी

मम हृदयाची ललित रागिणी
होशिल का तू माझी ग राणी
सांग अता सुंदरी

तुझ्या प्रीतीचा मोहक चाळा
नकळत सखये भुलवी मनाला
प्रीतीसुधेने जीव बहरला
लाजू नको मम प्रणय-कामिनी

तुजपाशी ही काय मोहिनी
हृदय जिंकिले नयनशरांनी
धुंद सदा मी तुझ्या चिंतनी
का छळिसी मज गाली हसुनी?
गीत - बा. भ. बोरकर
संगीत -
स्वर- पंडितराव नगरकर
गीत प्रकार - भावगीत
ललित - मोहक / रमणीय.
शर - बाण.
सुधा - अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.