A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मानसकन्या कण्वमुनीची

मानसकन्या कण्वमुनीची
बसुनि वनी एकान्‍ती
गुंफिते माळ बकुळफुलांची

शारद नयनी उमलत होता
अनुरागाचा रम्य नीलिमा
अरुण कपोली गोड लालिमा,
फुलवित लाज तियेची

यौवन सौरभ पुसतो तिजला
कोण यायचा सखे पाहुणा?
नावाविणही घेत उखाणा,
प्रीत तिच्या हृदयाची

आठवणींची करिता मृगया
हसते खुदुखुदु मनी आतुरता
सखया येता; मंगल घटिका,
आली स्वयंवराची
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - भावगीत
अनुराग - प्रेम, निष्ठा.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
कण्व - कश्यपकुलोत्‍पन्‍न ऋषी. यांनी शकुंतलेस सांभाळली होती.
कपोल - गाल.
सौरभ - सुगंध / कीर्ती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.