A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मनात नसता काही गडे

मनात नसता काही गडे
का प्रीत तयावर तुझी जडे?

मंदिरात मी हात जोडिता
अनोळखी तो जवळी येता
बघता बघता हरवुन जाता
का नेत्रपाखरू तुझे उडे?

किंचित हसता, किंचित फसता
रूपदेखणी प्रीत लाजता
विसरेना ते विसरू जाता
का उघड्या नयनी स्वप्‍न पडे?

शतजन्मांचे बंधन बांधुन
हिरवे कंकण करांत घालुन
प्रीत तिकडची कुंकु लाविता
का हळदीचे ते ऊन पडे?

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.