A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मायेविण बाळ क्षणभरी

मायेंविण बाळ क्षणभरी न राहे ।
न देखतां होय कासावीस ॥१॥

आणिक उदंड बुझाविती तरी ।
छंद त्या अंतरीं माउलीचा ॥२॥

नावडती तया बोल आणिकांचे ।
देखोनियां नाचे माय दृष्टी ॥३॥

तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली ।
आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥४॥
उदंड - पुष्कळ.
चाड - शरम.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.