A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी कुमार तीहि कुमारी

मी कुमार तीहि कुमारी असतांना जागीं एका ।
वाढलों खेळलों प्रेमप्रिय झालों एकामेकां ।
वरिल ती सुभद्रा मजला हा निश्चय सर्व लोकां ।

तैशांत रामकृष्णांनीं । वडिलांचें मत घेवोनी ।
मज दिधलीं ऐसें म्हणुनी । शेवट मग केला हा कां ।

जो प्रीतितरू वाढविला । त्यांनींच कसा तोडविला ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर-
नाटक - सौभद्र
चाल-उद्धवा शांतवन कर जा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
पृथक्‌

राम- बलराम, श्रीकृष्णाचा मोठा भाऊ.
 

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.