A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी नवनवलाचे स्वप्‍न काल

तू गुपित कुणाला सांगू नको आपुले
मी नवनवलाचे स्वप्‍न काल पाहिले !

स्वप्‍नात सावळा हरी
ये वाजवीत बासरी
त्या मधुर स्वरांनी मन माझे मोहिले !

कर घालुनी माझ्या गळा
गुजगोष्टी करी सावळा
हलकेच तये अधरास अधर जुळविले !

मी दचकुन उठले गडे
परि घडू नये ते घडे
कपट्याने माझे हृदयच गे चोरिले !
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.