A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नगरि नगरि ही सौंदर्याची

नगरिऽ नगरि ही सौंदर्याची खाण

कुणि पद्मिनी, कुणि चित्रिणी
मीनाक्षी कुणि हरिणाक्षी कुणि
त्यांतिल दो नयनांचे मजवरि
झालें शरसंधान

सुंदरतेच्या कथाहि सुंदर
सुंदरतेच्या व्यथाहि सुंदर
सुंदर या हृदयीं रुतलेला
सुंदर तोही बाण

जिकडेतिकडे सुंदर सुंदर
त्यांतच मीही झालो सुंदर
खरोखरी परमेश्वर सुंदर
त्याचे हे वरदान
शर - बाण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.