नरजन्मामधिं नरा
नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारायण गडी ।
तरिच ही सार्थक मानवकुडीं ॥
बा चौर्यांशी लक्षवेळ संसार पडला गळां ।
चिंतेचा पिकला मळा ॥
दार-धनाचा लोभ टाकुनी झटकर हो वेगळा ।
हा कसा उकलिशी पिळा ॥
धनानिमित्तें जनापुढें तूं दाविसि नाना कळा ।
किति तुला मुलांचा लळा ॥
तूं पडूं नको याचे भरीं ।
तुझ्या हें खापर फुटतें शिरीं ।
तुला मी गोष्ट सांगतों खरी ।
आतां कर तांतडी ।
ही पुन्हा न ये बा घडी ॥
तरिच ही सार्थक मानवकुडीं ॥
बा चौर्यांशी लक्षवेळ संसार पडला गळां ।
चिंतेचा पिकला मळा ॥
दार-धनाचा लोभ टाकुनी झटकर हो वेगळा ।
हा कसा उकलिशी पिळा ॥
धनानिमित्तें जनापुढें तूं दाविसि नाना कळा ।
किति तुला मुलांचा लळा ॥
तूं पडूं नको याचे भरीं ।
तुझ्या हें खापर फुटतें शिरीं ।
तुला मी गोष्ट सांगतों खरी ।
आतां कर तांतडी ।
ही पुन्हा न ये बा घडी ॥
| गीत | - | शाहीर रामजोशी |
| संगीत | - | वसंत देसाई |
| स्वर | - | जयराम शिलेदार |
| चित्रपट | - | शाहीर रामजोशी |


















