A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निळा समिंदर निळीच नौका

निळा समिंदर, निळीच नौका
निळे वरी आभाळ
निळी पैठणी, निळसर राणी
निळीच संध्याकाळ

बेतात राहू दे नावेचा वेग
रातीच्या पोटात चांदाची रेघ

डचमळ डुचमळ नकोच फार
नावेत नवखी गर्भार नार
चालू दे नाव जसा श्रावण मेघ

नाजूक नारीला नकोच त्रास
कळीच्या झोळीत लपला सुवास
म्यानात राहू दे वार्‍याची तेग

अलगद होऊ दे नौकेची चाल
धिमाच राहू दे वल्ह्याचा ताल
नकोस पाडू रे पाण्याला भेग

पल्याड दिसतिया खाडीची वेर
नाजूक नारीचे तिथे माहेर
आवर मायेचा नारी आवेग
तेगा - लहान, वाकडी तलवार.
वेर - बांध

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.