A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नृपति-कन्या कां वाटे

नृपति-कन्या कां वाटे अनुरूप कांता ॥

गरीब मी दुबळी बळें । मज शोकिं लोटिलें ।
वचन तसलें । मजसि दिधलें ।
उचित गमलें । असें आतां ॥
गीत - वा. वा. खरे
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर- शंकरराव सरनाईक
नाटक - चित्रवंचना
राग - भैरवी
ताल-त्रिवट
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कांता - पत्‍नी.
नृपति - राजा.
या नाटकांत नायिका व तिची सखी यांनीं आपआपसांत नांवें व स्थानें बदलून नायकास फसविण्याचा उद्योग केला आहे एवढयावरून 'संदेश' पत्राच्या आक्टोबर १९१६ च्या एका अंकांत कोणी एकानें असें प्रसिद्ध केलें कीं, हे मूळ नाटक भास कवीनें केलें असून तेंच 'चित्रवंचना' नांव देऊन मीं मराठींत उतरले आहे !

आधी भास कवीचें असलें संविधानक माझ्या पाहण्यांत नाहीं, आणि त्यांतून ही कल्पना सुचायला भासासारख्या प्राचीन कवीकडे धांव घेण्याचें कारणही नव्हतें ! नांवें व स्थानें बदलण्याची ही कल्पना सामान्य असून ती इंग्रजी नाटक-कादंबर्‍यांतून व आमच्या इकडच्या जुन्या गोष्टींतून कोणच्याना कोणच्या तरी रूपानें पुष्कळदां आलेली आहे. अशीच एक गोष्ट थोरले शाहूमहाराजांच्या बखरींत (पृ. ५) नमूद आहे, ती वाचून मला या नाटकाचें संविधानक रचण्याची प्रथम स्फूर्ति झालेली आहे ! कुणीकडे भास कवि आणि कुणीकडे आमचे बखरवाले चिटणीस !

नाटक बसवितांना प्रयोगास अनुकूल असें पुष्कळ फेरफार मूळ पुस्तकांत करावे लागले. त्या कामीं मला 'शिवराज संगीत मंडळी'चे मालक रा. रा. गोविंद सदाशिव टेंबे व स्टेज डिरेक्टर रा. रा. राजाराम नारायण पुरोहित यांच्या सल्ल्याचा मोठा उपयोग झाला. याबद्दल या दोघांही गृहस्थांचा मी फार आभारी आहे.

शिवाय रा. रा. टेंबे यांनी पदांच्या चाली दिल्या याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत.
(संपादित)

वासुदेव वामन खरे
दि. २९ जानेवारी १९१७.
'चित्रवंचना' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- वासुदेव वामन खरे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.