पाण्या तुझा रंग कसा
पाण्या, तुझा रंग कसा ?
ज्याला जसा हवा तसा !
चांदराती चंद्रापरी, काळ्या राती कृष्णापरी
या रे कुणी तीरी बसा, ज्याचा त्याला दिसेल ठसा !
पाण्या, तुझा गंध कसा ?
मेळ ज्यासी घडे तसा !
फेका तरी हार ताजा, मोगर्याचा वास माझा
चंदनाने चंदनसा, गंधकाने गंधकसा !
पाण्या तुझा स्वाद कसा ?
ज्याला जसा हवा तसा !
साखरेने गोड करा, द्राक्षरसे मधुर जरा
अमृताने अमृतसा, विषासवे विष जसा !
येती किती जाती किती, त्याची मला नाही भीती
वाहतसे नित्य असा, कुणी हसा कुणी रुसा !
ज्याला जसा हवा तसा !
चांदराती चंद्रापरी, काळ्या राती कृष्णापरी
या रे कुणी तीरी बसा, ज्याचा त्याला दिसेल ठसा !
पाण्या, तुझा गंध कसा ?
मेळ ज्यासी घडे तसा !
फेका तरी हार ताजा, मोगर्याचा वास माझा
चंदनाने चंदनसा, गंधकाने गंधकसा !
पाण्या तुझा स्वाद कसा ?
ज्याला जसा हवा तसा !
साखरेने गोड करा, द्राक्षरसे मधुर जरा
अमृताने अमृतसा, विषासवे विष जसा !
येती किती जाती किती, त्याची मला नाही भीती
वाहतसे नित्य असा, कुणी हसा कुणी रुसा !
| गीत | - | ग. दि. माडगूळकर |
| संगीत | - | सुधीर फडके |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | पोस्टातली मुलगी (१९५४) |


















