A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
परम सुवासिक पुष्पें

परम सुवासिक पुष्पें कोणी चातुर्यें गुंफिति नारी ।
सुगंध तैलें वासित करिती शय्यावस्त्रें धरुनि करीं ।
नानापरीचे विडे मनोहर तबकांमध्यें कोणी भरी ।
अंगराग ते तयार करुनी ठेविति शेजेशेजारीं ।
खिडक्यांचे वाळ्याचे पडदे भिजवुनि कोणी गार करी ।
गुलाबपाणी थंड करोनी शिंपित कोणी गच्चिवरी ।
सर्व तयारी नीट कराया दक्ष असति जन किती तरी ।
वाटे मज मंदिर हें करिलचि वैकुंठाची बरोबरी ॥
अंगराग - सुगंधी उटणे.
शेज - अंथरूण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.