A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाऊल पडते अधांतरी

उरात धडधड सुरांत होते श्वास चुकवितो ताल परि
कशी सावरू तोल कळेना, पाऊल पडते अधांतरी !

कशी मोहिनी केली कोणी मलाच माझे ना कळते
मनात माझ्या फुलून अलगद फूल प्रीतीचे दरवळते
एक अनावर ओढ फुलविते गोड शिरशिरी तनूवरी

आठवणींच्या हिंदोळ्यावर होऊनि हळवे मी झुलते
कणाकणांतून इथल्या वेडा जीव गुंतला सोडवते
आनंदाचा घन पाझरतो गहिवर दाटून येई उरी

स्वप्‍न म्हणू की भास कळे न आज मी बावरते
प्रीत जणू रेखीत तुझ्या मिठीत मी मोहरते
हात दे रे हातात राहू दे साथ जन्मांतरी, जन्मांतरी !
हिंदोल (हिंडोल) - झुला, झोका.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.