A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रीतीचा नव वसंत फुलला

प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बाग दिलाचा दरवळला

पुरे प्रीतीचा छंद चाळा, जगावेगळा हा असला
नाजुक साजुक गोजिरवाणी, किती ग भोळी तू फुलराणी
प्रणय साज शृंगार साजणी, अंगारच जणू रसरसला

प्रियकर मधुकर धावुन येईल, रसिकराज मधुरुंजी घालील
मंजुळ गुंजनी सदा रंगविल ह्या हसर्‍या फुलराणीला

कुटिल भृंग रंगेल वृत्तीचा, लुटिल नवरसरंग नवतीचा
वंचिल चंचल निष्ठुर साचा, लोटिल विरहानली कलिकेला

प्रेमळ कमळण चतुर धूर्तही, भृंगसख्याला कोंडिल हृदयी
सहजच तो मग अंकित होई, जिंकित प्रेम जगाला
अंकित - गुलाम.
कमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.
नवती - तरुणी / तारुण्य / नवी पालवी.
नवती - नवी पालवी.
मधुकर - भ्रमर, भुंगा.
विरहानल - वियोगजन्य शरीरदाह.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.